वाडीतील टायगर ग्रुपची पूरग्रस्तांना मदत

173

विदर्भ वतन न्युज पोर्टल, वाडी – मागील आठवड्यात कोकण, कोल्हापूर, सांगली पूरग्रस्त भागात महापुरामुळे सगळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले. येथील पूरग्रस्त पीडितांना जीवनावश्यक वस्तूची मदत व्हावी म्हणून वाडी स्थित टायगर ग्रुपने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव यांच्या आवाहनानुसार संयोजक रवी अजितसह, गुलशन शेंडे, देवेंद्र शेंडे, रामकिशोर रहांगडाले, कृष्णा पटले, सुरज कातडे, सिद्धार्थ मेर्शाम, विजय कटरे, रामेश्‍वर अजित, कमल तायडे, समीर काकडे आदी नागरिकांच्या मदतीने या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करून तांदूळ, पीठ, तेल, मीठ, मिरची, हळद, बिस्किट पाकीट, आलू, कांदे आदी वस्तू गोळा करून नुकतेच रवाना केले आहे. टायगर ग्रुपच्या या कार्याबद्दल त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.