Home Breaking News होस्टलच्या भोजन खर्चात अतिरिक्त 4 कोटींची वाढ प्रकरणाची कसून चौकशी केल्यास निघेल...

होस्टलच्या भोजन खर्चात अतिरिक्त 4 कोटींची वाढ प्रकरणाची कसून चौकशी केल्यास निघेल मोठे घबाड

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11901*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

157 views
0

होस्टलच्या भोजन खर्चात अतिरिक्त 4 कोटींची वाढ
प्रकरणाची कसून चौकशी केल्यास निघेल मोठे घबाड

विदर्भ वतन, नागपूर : समाजकल्याण विभाग अंतर्गत होस्टल मधील निवासी विद्यार्थ्यांच्या भोजन खर्चात वर्ष २०१८-१९ पेक्षा वर्ष २०१९- २० या सत्रात जवळपास ४ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करण्यात आले. भोजन खर्चात करोडोचा घोटाळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूर जिल्ह्यात समाजकल्याण विभागाचे २४ निवासी होस्टल आहेत. वर्ष २०१८-१९ या सत्रात होस्टलमध्ये २९९० विद्यार्थी राहत होते. वर्ष २०१९- २० या सत्रातही एवढेच विद्यार्थी होते. वर्ष २०१८-१९ चा भोजन खर्च ५,९५,४५,६४१ दाखविलेला आहे तर वर्ष २०१९-२० चा भोजन खर्च ९,४१,६७,८५४ रुपए दाखविला गेला आहे. अतिरिक्त खर्च यावेळी जास्त असल्याने विद्यार्थी संगठनेने यावर संशय घेतला आहे. ही माहिती समाजकल्याण विभागाने माहितीच्या अधिकाराअंतर्गत जाहीर केली आहे.
नागपूर जिल्ह्यात समाजकल्याण विभागाचे 24 होस्टल आहे. यातील विद्यार्थ्यांना भोजन पुरविण्याचे ठेका टायगर सावजी कॅटर्स जयताला, संजय भोजनालय एन्ड लक्ष्मी भोजनालय वर्धा, मे. आनंद एल. टेंभुर्णे सिद्धार्थनगर टेका, अनिल अग्रवाल बाजार लाइन देवरी, गोंदिया, निसर्ग महिला बचत गट नेताजीनगर, भरतवाडा यांना देण्यात आला होता. यांच्याकडून वर्ष २०१८-१९ पेक्षा वर्ष २०१९- २० या सत्रात भोजन पुरविण्यात आले. भोजन पुरविण्याचे दर प्रति विद्यार्थी प्रति थाली समान असतानाही अतिरिक्त 4 कोटी रुपए भोजन खर्च कसा वाढला याबाबत शंका उत्पन्न होत आहे.