कांग्रेस तर्फे मोफत नेत्र तपासणी व डिजीटल एक्स रे,शुगर, ईसीजी तपासणी शिबीर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11895*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

182

कांग्रेस तर्फे मोफत नेत्र तपासणी व डिजीटल एक्स रे,शुगर, ईसीजी तपासणी शिबीर

विदर्भ वतन, नागपूर : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अन्नाभाउऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवार २ आॅगस्ट रोजी भारतीय राष्टÑीय कांग्रेस तर्फे मोफत नेत्र तपासणी व डिजीटल एक्स रे,शुगर, ईसीजी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रम सार्वजनिक हनुमान मंदीर, एनआयटी गार्डन, ओंकार नगर नागपूर येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला.


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, महाराष्टÑ प्रदेश कांग्रेस कमेटी सचिव गिरीश पांडव, महाराष्टÑ प्रदेश कांग्रेस कमेटी सचिव विशाल मुत्तेमवार,ब्लॉक क्र. ६ दिनेश तराळे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक व गरजू लोकांना मोफत चश्मे वाटप करण्यात आले. इतर नागरिकांनी कमी दरात चश्मे देण्यात आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी अनु. जमाती शहर अध्यक्ष व नगरसेवक प्रवीण सांदेकर, आरोग्य सेल शहर अध्यक्ष डा. सुधीर आघाव, डॉ. सेलचे महासचिव जितलाल साहू, कल्पनाताई जोगे, अश्वीनकुमार इंगोले, विजय गभने आशीष सरोदे व इतर पदाधिका-यांनी अथक प्रयत्न् केले