Home आरोग्य उमरेड तहसीलमध्ये स्वच्छता पंधरवाड्याचा शुभारंभ

उमरेड तहसीलमध्ये स्वच्छता पंधरवाड्याचा शुभारंभ

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11884*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

95 views
0

उमरेड तहसीलमध्ये स्वच्छता पंधरवाड्याचा शुभारंभ

विदर्भ वतन,उमरेड- नेहरू युवा केंद्र, नागपूर शिवसाम्राज्य ग्रुप उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने उमरेड तहसील मध्ये 1 आॅगस्ट ते 15 आॅगस्ट स्वच्छता पंधरवाडाचे आयोजन करण्यात आले आहे. तहसील मधील तिरखुर गावात 1 आॅगस्ट रोजी स्वच्छतेची शपथ घेऊन पंधरवाड्याची सुरुवात करण्यात आली. या वेळी गाव स्वच्छता अभियान, पोष्टर, इत्यादीच्या माध्यमातून जनजगृती करण्यात येणार आहे.
निरोगी जीवनासाठी स्वच्छता ही काळाची गरज आहे. परिसर स्वच्छ ठेवा, मन प्रसन्न ठेवा असे मत शिवसाम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष मोनिष अठ्ठरकर यांनी व्यक्त केले .
नेहरू युवा केंद्र नागपूरचे स्वयंसेवक प्रतीक अठ्ठरकर यांच्या नेतृत्वात हा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. यशस्वीते करीत पिल्लवी बनकर, धनंजय गुंफलवार, मयुरी बनकर, सुहानी वाघमारे, जानवी सवाईमुल, यामिनी राऊत ,सोहन उरकुडे इत्यादी सहकार्य करत आहेत