“मिस डज्जिलांग इंटरनॅशनल विजेता” नागपूरची सायली टेकाडे ठरली.

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11879*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

138

“मिस डज्जिलांग इंटरनॅशनल विजेता” नागपूरची सायली टेकाडे ठरली.

विदर्भ वतन,नागपूर : मुंबईतील अंधेरी एमआयडीसी च्या रेडिसन्स येथे सिनेस्टेपने आयोजित फॅशन शो स्पर्धा कार्यकमात “मिस डज्जिलंग इंटरनॅशनल ” स्पर्धेत संपूर्ण देशभरातील अनेक स्पर्धकांनी सक्रिय भाग घेतलेला होता. ज्यामध्ये ३०० हून अधिक स्पर्धकांनी पुणे, मुंबई, नागपूर, कलकत्ता, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली इत्यादी शहरांमधून आॅनलाइन आॅडिशन्स दिल्या. त्यापैकी १० जणांची अंतिम फेरीत निवड झाली. मुंबईत झालेल्या या स्पर्धेत नागपूरच्या सायली टेकाडे ने आॅडिशन फेरी, टॅलेंट फेरी, रॅम्प वॉकमध्ये चांगली कामगिरी केली. आणि मिस डज्जिलिंग इंटरनॅशनल सायली टेकाडे विजेती ठरली. नागपुरातील चित्रपट दिग्दर्शक अनिल सहाने यांनी क्राउन घालून उज्ज्वल भविष्यासाठी विजेत्या सायलीचे अभिनंदन केले. सायली ही दीक्षाभूमी येथील आंबेडकर कॉलेज, नागपूरच्या बीएससीच्या प्रथम वषार्ची विद्यार्थिनी आहे. सायलीला मॉडेलिंग, नृत्य आणि गायनाची आवड होती. ज्यामुळे तिला दिग्दर्शक अनिल सहाने यांच्याकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाले. तिने मिस डाजीर्लांग इंटरनॅशनल स्पर्धेत भाग घेतला आणि विजेता मिळवून नागपूरचे नाव उंचावले. सायलीने सांगितले की, प्रथम अभ्यास आणि मॉडेलिंग आणि चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करेल. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल सहाने यांनी नागपुरात अनेक वर्षांपासून फिल्मसिटी बनवली. जेणेकरून विदभार्तील कलाकारांना नागपूरच्या उपराजधानीत आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी मिळेल, यासाठी त्यांनी अनेक प्रसिद्ध माध्यमांद्वारे आवाहन केले. सायलीने यशाचे श्रेय पालक आणि शिक्षक तसेच मित्रमंडळी व दिग्दर्शक अनिल सहाने यांना दिले व सर्वांचे आभार मानले.