कोरोना काळात सावकारीचा बळी? अकोल्यात कॅटरर्सच्या मालकाची आत्महत्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11869*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

181

कोरोना काळात सावकारीचा बळी? अकोल्यात कॅटरर्सच्या मालकाची आत्महत्या

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, अकोला – कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेला व्यवसाय आणि डोक्यावर खासगी सावकारांच्या कर्जाचा बोजा. यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली असलेले अकोल्यातील शगुन कॅटरर्सचे मालक अल्पेश अरविंद उपाध्याय यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये तिघांच्या नावांचा उल्लेख केला आहे. त्यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. यामुळे या प्रकरणाला खासगी सावकारी कारणीभूत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

अकोले जुने शहर परिसरातील जयहिंद चौकात अल्पेश उपाध्याय राहत होते. ३४ वर्षीय अल्पेश यांचा शगुन कॅटरर्स हा व्यवसाय होता. लॉकडाऊनमुळे इतरांप्रमाणे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला होता. व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. असे असताना त्यांनी काही खासगी बेकायदा सावकारांकडून कर्ज घेतले होते. या सावकारांनी त्याच्या परतफेडीसाठी कोरोना काळात त्यांच्यामागे तगादा लावला होता. यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. शेवटी या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत तिघांच्या नावाचा उल्लेख केला आहे. यावर अकोले जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत. खासगी सावकारीच्या त्रासामुळे अल्पेश उपाध्याय यांनी आत्महत्या केल्याची चर्चा या परिसरातील नागरिकांमध्ये आहे.