
कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत साहित्य संमेलन होणार नाही
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : औरंगाबाद- 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार आहे. मात्र मंगळवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जोपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होणार नाही, तोपर्यंत साहित्य संमेलन होणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेऊन याबाबत माहिती दिली.
कौतिकराव ठाले म्हणाले की, नाशिक साहित्य संमेलन स्वागत मंडळ आणि साहित्य मंडळ सदस्य चर्चा करण्यासाठी आले आहेत. संमेलन व्हायला पाहिजे, अशी अनेकांची इच्छा आहे. लोकांचा मान राखून साहित्य संमेलन झाले पाहिजे. मात्र, जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. तसेच सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत संमेलन आयोजित करता येणार नाही. तसेच कोरोनामुळे सध्या बहुतेक सार्वजनिक कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. साहित्य संमेलन ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल का ? या प्रश्नावर ठाले यांनी स्पष्टीकरण दिले आहे . त्यांनी ऑनलाईन साहित्य संमेलन आयोजित केले जाणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच ऑनलाईन संमेलन हे संकल्पनेत बसत नाही. लोकांना पुस्तक खरेदी करावे लागतात, असे ठाले यांनी म्हटले.

