नागपूरात डेंग्यू तपासणीचे संच संपले! मनपाची माहिती

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11859*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

113

नागपूरात डेंग्यू तपासणीचे संच संपले! मनपाची माहिती

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- नागपूरमध्ये एकीकडे डेंग्यूचा उद्रेक सुरू असतानाच दुसरीकडे महापालिकेकडे डेंग्यू तपासणीच्या किट्स संपल्याची माहिती आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रयोगशाळेतील डेंग्यूच्या तपासण्या ठप्प पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाने किट्स कमी असल्या तरी तपासणी सुरू असल्याचा दावा केला आहे.
शहरात जुलै या एकाच महिन्यात येथे 252 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिकेकडून त्यांच्या रुग्णालयात डेंग्यूची तपासणी करण्याची सोय आहे. परंतु डेंग्यू तपासणीच्या किट्स संपल्यामुळे या तपासण्या ठप्प पडल्याची सूत्रांची माहिती आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाला या किट्स शासनाकडून पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतून उपलब्ध केल्या जातात. परंतु काही दिवसांपासून मागणीच्या तुलनेत पुरवठा झाला नसल्याने हा तुटवडा पडल्याची माहिती आहे. महापालिकेने किट्सची मागणी नोंदवली असली तरी पुरवठा कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही.शहरात हल्ली डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महापालिकेवर तपासणीचाही भार वाढला आहे. 2 ऑगस्टला महापालिकेकडे सुमारे 700 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पडून असल्याचे समजते आहे. मात्र महापालिकेकडे किट्सचा तुटवडा असला तरी उपलब्ध संसाधनांतून चाचण्या सुरू आहेत. काही नमुने चाचणीच्या प्रतीक्षेत असले तरी लवकरच पुण्याच्या एनआयव्हीकडून किट्स पुरवठा होऊन चाचण्या सुरळीत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.