बनावट दारूमुळे मृत्यू झाल्यास आरोपीला होणार फाशीची शिक्षा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11854*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

238

बनावट दारूमुळे मृत्यू झाल्यास आरोपीला होणार फाशीची शिक्षा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थानवी दिल्ली- मध्य प्रदेशात अवैध दारू विक्रीवर आता कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. अवैध दारूमुळे कोणाचा मृत्यू झाला तर आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली जाईल, असा निर्णय मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह चौहान सरकारने घेतला आहे. यापूर्वी या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. याशिवाय दंडाची रक्कम 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. विधानसभेच्या या अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक देखील आणणार असल्याचे सांगितले जात आहे.

मध्य प्रदेश सरकारने दारूच्या तस्करी आणि त्याच्या अवैध धंद्याला रोखण्याच्या उद्देशाने 20 पेक्षा जास्त सुरक्षा मानकांसह दारूच्या बाटल्यांवर क्यूआर कोड होलोग्राम बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले की, अवैध दारू व्यवसायात सहभागी असणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. याशिवाय शेजारील राज्यांतून अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील, असे ते म्हणाले. या निर्णयाप्रमाणे जर कोणी अवैध भेसळयुक्त दारू पिऊन मरण पावले तर प्रथमच आरोपीला 10 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा केली जाऊ शकते. किंवा दुसर्‍यांदा किंवा पुन्हा असाच गुन्हा केला तर आरोपीला फाशीची शिक्षा होऊ शकते.