
यंदा सीबीएसई दहावीचा निकाल ९९.०४ टक्के
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईचा दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. मूल्यांकन पद्धतीने जाहीर केलेला हा निकाल ९९.०४ टक्के लागला. कोरोनामुळे यंदा सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द झाली होती. त्यानंतर मूल्यांकन पद्धतीने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सीबीएसई दहावीच्या आज जाहीर झालेल्या निकालात २ लाख ९६२ म्हणजे ४.१६ टक्के विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्के गुण मिळाले आहेत. ५७ हजार ८२४ विद्यार्थ्यांना ९५ टक्के गुण मिळाले आहेत. त्यांचे प्रमाण २.७६ टक्के आहे. तर १६ हजार ६३९ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केलेला नाही. सीबीएसई दहावीच्या परीक्षेत मुलींची पास होण्याची टक्केवारी ९९.२४ टक्के आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९८.८९ टक्के आहे. म्हणजे मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ०.३५ टक्के जास्त आहे. यंदा सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेसाठी २ लाख ९७ हजार १२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ७६ हजार ९९७ विद्यार्थी पास झाले आहेत.

