
उमरेड विधानसभा क्षेत्रात आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
विदर्भ वतन, उमरेड-आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते २५१५, ३०५४, आमदार निधी, खनिज विकास निधी, अर्थसंकल्पीय, तीर्थक्षेत्र, नागरी सुविधा, जन सुविधा, जिल्हा वार्षिक, अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास या कामांचे उमरेड तालुक्यामध्ये भूमिपूजन करण्यात आले.
दि. ०१/०८/२०२१ रोज रविवार ला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांचा हस्ते २५१५, ३०५४, आमदार निधी, खनिज विकास निधी, अर्थसंकल्पीय, तीर्थक्षेत्र, नागरी सुविधा, जन सुविधा, जिल्हा वार्षिक, अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास कामाचे भूमिपूजन सुकळी, हिवरा, सिर्सी, किन्हाळा, मानोरी, पिपरा, सायसर, सावंगी खुर्द, बोरीमजरा, सांडीगोंडी, शेडेश्वर, चिखलधोकडा, आमघाट, कळमना बे, सालईराणी, बोरगाव ला, कवडापुर, खुसार्पार बेला, येथे भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व सर्व संबधित अधिका?्यांना उरलेल्या कामांच्या प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. या मध्ये पिण्याचा पाण्याच्या समस्या, लाईटच्या समस्या,शेतक?्यांना जाण्या करिता पांढनच्या समस्या नागरिकांनी मांडल्या.
या वेळी भूमिपुजन समारंभास माजी ऊर्जा मंत्री राजेंद्रबाबू मुळक, सभापती समाजकल्याण नेमावली माटे, रमेश किलनाके सभापती पं. स. उमरेड, जि. प. वंदना बालपांडे, मिलींद सुटे, प.स.सदस्य प्रियंका लोखंडे, गितांजली नागभिडकर, जयश्री देशमुख, पुष्कर डांगरे, दादाराव मांडस्कर माजी जि. प. सदस्य पद्माकर कळू, दिलीप भोयर, सुभाष मुळे, शिवदास कुकळकर, विश्व्जीत थुल, संजय ठाकरे, अरुण बालपांडे, नागसेन निकोसे, सुकराम सोनटक्के, माजी प. स. सदस्य सुरेश लेंडे, अध्यक्ष सं.गा.नी.योजना जितेंद्र गिरडकर, राजेश लोहकरे, देवराव मेंघरे, सुभाष तेलरांधे, संजय ठाकरे, विश्व्जीत थुल, ज्योतीकुमार देशमुख, सुरज कांबळे, चेतन पडोळे, रितेश राऊत, महेंद्र तेलरांधे, रजत केदार, तसेच सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

