Home Breaking News दोस्त दोस्त न रहा….

दोस्त दोस्त न रहा….

0
दोस्त दोस्त न रहा….

दोस्त दोस्त न रहा….

विदर्भ वतन, नागपूर-प्रत्येक अडचणीच्या वेळी प्रथम धावून येणारा नातेवाईक म्हणजे मित्र, अशी मित्रत्वाची व्याख्या केली जाते. मात्र, जीवलग मित्र जिवावर उठला असेल तर याला काय म्हणावे. असाच काहिसा प्रकार देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महामार्ग ४४ वरील चोरबाहुली गावालगत १६ जुलै रोजी घडला. या लूटमारी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ दिवसात छडा लावून मैत्रदिनाच्या पूर्वदिनी मित्राचा विश्वासघात करणा-या आरोपीला गजाआड करण्यात यश मिळविले.
सविस्तर वृत्त असे की, दि. १६ जुलै रोजी सायंकाळी अमित बालाजी नागपुरे (रा. शनिवार वॉर्ड, रामटेक) हा त्याचा मित्र अश्?विन उके व सोनू सोनावने यांच्यासोबत दुचाकीने चोरबाहुली मार्गे हिवरा बाजारला येत असता चोरबाहुली गावाच्या अगोदर महामार्ग ४४ वरून जात असताना एक अनोळखी सडपातळ बांध्याचा इसम वय अंदाजे ३५ वर्ष लाल रंगाचे चौकडीचे शर्ट घातलेला व तोंडावर लाल रंगाचा स्कार्फ बांधलेला काळ्या रंगाच्या पल्सर गाडीने अमितच्या गाडीच्या समोर चाकू घेऊन लूटमार करण्याच्या इरद्याने येऊन अमितच्या पार्श्वभागावर घाव मारून जखमी करून त्याच्या खिशातून नगदी ३0 हजार रुपये जबरीने हिसकावून नेले. याप्रकरण अमितच्या तक्रारीवरून देवलापार येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. शनिवारी (३१ जुलै) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वरील गुन्ह्यातील घटनेवेळी जखमी अमितच्या सोबत असलेला त्याचा मित्र अश्विन नरेंद्र उके (वय २७, रा. जाम, ता. मोहाडी, जि. भंडारा, ह.मु.बध्व हसमुख पटेल, लाल दिवानशाह दगार्मागे, बायपास रोड, ता. रामटेक, जि. नागपूर) याला संशयावरून ताब्यात घेऊन घटनेबाबत विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तर दिले. त्याला विश्वासात घेऊन पथकास असलेल्या संशयाच्या आधारे अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदर गुन्ह्यातील जखमी अमित हा त्याचा चांगला मित्र असून, त्याने त्याच्याकडून काही महिन्यांपूर्वी १,१४,000 रुपये उधार घेतले होते. व ते पैसे वेळेत परत न केल्याने अमितने त्याच्याकडे पैशाची मागणी करून रोज तगादा लावला होता. यामुळे आरोपी अश्विन उके याच्या मनात अमितबद्दल द्वेष निर्माण झाला. अमित हा लॉज व्यावसायिक असल्याने त्याच्याजवळ नेहमी मोठी रक्कम राहत असल्याचे आरोपील माहीत होते. त्याने यातून मार्ग काढण्यासाठी त्याचा मित्र विक्की मोरसिंग बोडे (वय २२, रा. वॉर्ड क्र. २, कन्हान पिपरी) याच्या मदतीने अमितला मारहाण करून लूटमार करण्याची योजना आखली होती.
यानुसार सोनू सोनावणे यास बसवून उधार घेतलेले पैसे परत करतो असे सांगुन योजनेनुसार चोरबाहुली शिवारात गाडीवर मध्यभागी बसलेल्या अमितला विक्कीने धारधार शस्त्राने वार करून त्याच्याजवळील नगदी ३0 हजार रुपये हिसकावून घेऊन पळ काढला. यावेळी आरोपी अशिन ठरल्याप्रमाणे त्याच्या ताब्यातील गाडी घेऊन घटनेच्या ठिकाणावरून पळुन गेला होता. व काही वेळाने जखमी अमितला संशय येऊ नये म्हणून परत घटनेच्या ठिकाणी येऊन त्याला दवाखान्यात घेऊन गेला होता. अश्?विनच्या सांगण्यावरून विक्कीबाबत कन्हान पोलिसांना माहिती देऊन विक्की व अश्?विनला देवलापार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास देवलापार पोलिस करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे मार्गदर्षनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, सपोनि राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, पोहवा नाना राऊत, पोशि विपीन गायधने, रोहन डाखोरे, अमोल वाघ, चालक अमोल कुथे व सायबर सेलचे सतिश राठोड यांनी पार पाडली.