आॅटोचालकांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11820*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

188

आॅटोचालकांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

विदर्भ वतन, नागपूर- घरातून निघून गेलेल्या एका १७ वर्षांच्या मुलीवर तीन आॅटोचालकांनी सामूहिक अत्याचार केला. सततच्या बलात्कारामुळे मानसिकदृष्ट्या खचलेली ही मुलगी रेल्वेस्थानकावर दिसली. तिची विचारपूस केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हे दृष्कृत्य करणा-या नराधमांपैकी तीन आॅटोचालकांना अटक करण्यात आली असून, चार आरोपी पसार झाले आहे. दोन कुलींचाही यात समावेश आहे. तीन दिवसानंतर घटनेचा उलगडा झाला आहे.
मोहम्मद शाहनवाज ऊर्फ सना मोहम्मद रशीद (वय २५), मोहम्मद तौसीफ मोहम्मद युसूफ (वय २६) आणि मोहम्मद मुशीर (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या नराधमांची नावे आहेत. हे तिघेही मोमीनपुरा येथे राहत असून, आॅटोचालक आहेत. पीडित मुलींच्या कुटुंबात कौटुंबिक वाद झाले. यानंतर या मुलीने चार दिवसांपूर्वी घर सोडले. ती नाशिकला जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर पोहोचली. गुरुवारी रात्री ती रेल्वेस्टेशनवर आली. मात्र, तिच्याजवळ पैसे नव्हते. त्यामुळे तिला तिकीट काढता आले नाही. परिणामी येथून ती पायी चालत लोहापूल परिसरात आली. येथे एकटी मुलगी पाहून आरोपींची वासना जागृत झाली. त्यांनी मुलीची विचारपूस केली. तसेच आरोपी सनाने तिला पैसे देण्याचे आमिष दाखवत आॅटोमध्ये बसविले. तिला टिमकी येथील त्याच्या एका मित्राच्या खोलीत आणले. नंतर सनाने आरोपी तौसीफ आणि आरोपी मुशीरला फोन करून बोलावले. त्या दिवशी रात्री तिघांनी या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर पहाटे आलेल्या दोन कुलींनीही तिला आपल्या वासनेची शिकार बनविले. यानंतर अर्धमेल्या अवस्थेत मुलीला आॅटोमध्ये बसवून मेयो हॉस्पिटलच्या समोर आणून सोडून आरोपी पसार झाले.
पीडित मुलगी मेयो रुग्णालयासमोर बसली असताना आणखी दोन आॅटोचालक तेथे आले. त्यांनी जबरदस्तीने तिला आॅटोमध्ये बसविले आणि मेट्रो पुलाखाली अंधारात नेऊन तिच्यावर बलात्कार केला व पळून गेले. रात्री उशिरा पीडित मुलगी रस्त्यावर एकटी उभी होती. तिची अवस्था पाहून रस्त्यावरून जाणा-या दोघा नागरिकांनी तिची आस्थेने चौकशी केली. तिने नाशिकला जाण्यासाठी पैसे मागितले. नागरिकांनी तिला पैसे दिले. ती तिकीट घेऊन स्टेशनच्या आत पोहोचली. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर तिची संशयास्पद अवस्था पाहून चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधीने तिला स्टेशन मास्तरांच्या मदतीने जीआरपी पोलिस ठाण्यात नेले. तिथे तिची आरोग्य तपासणी करण्यात आली. लोहमार्ग पोलिसांनी पीडित मुलीला रात्रीच शेल्टर होममध्ये नेले. दोन दिवस शेल्टर होममध्ये राहिल्यानंतर पीडित मुलीने अधीक्षकाला तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले.
नागपूर लोहमार्ग पोलिसचा कार्यभार स्वीकारलेल्या पीआय मनीषा काशीद यांनी हे प्रकरण गांभीयार्ने घेत स्वत: पीडितेचे बयाण नोंदविले. पीडितेने केवळ एका सना आॅटोचालकाचे नाव सांगितले. काशीद यांनी आपल्या पथकामार्फत सना नामक आॅटोचालकाचा शोध घेतला. त्यानंतर शहर आणि स्टेशन परिसरातील इतरही आॅटोचालकांचा शोध घेतला. कसून चौकशी केल्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पीडित मुलीला सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल केला.