रेल्वेमध्ये १६६४ पदांची भरती, उद्यापासून भरता येणार अर्ज

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11815*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

138

रेल्वेमध्ये १६६४ पदांची भरती, उद्यापासून भरता येणार अर्ज

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :नवी दिल्ली – उत्तर मध्य रेल्वेत बंपर भरती सुरू झाली असून प्रशिक्षणार्थींच्या जागेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया २ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर १ सप्टेंबर २०२१ रोजी संपणार आहे. या भरतीद्वारे १६६४ पदांची नेमणूक केली जाणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी rrcpryj.org या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

प्रशिक्षणार्थींना २०२०-२१ या सालासाठी उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागात प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे. तर अधिनियम १९६१ अंतर्गत नियुक्त केलेल्या ट्रेडमध्ये प्रशिक्षित केले जाणार आहे.

ज्या उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा १०+२ परीक्षा पद्धतीत दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

याचबरोबर ट्रेड वेल्डर, वायरमन आणि सुतार यांच्यासाठी मान्यताप्राप्त शाळेतून ८ वी पास किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. NCVT / SCVT द्वारे अधिसुचित केलेल्या ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र / ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे. वयोमर्यादा १५ वर्षे ते २४ वर्षे दरम्यान असावी.

उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. SC/ST/PWD/महिला अर्जदारांना कोणतेही शुल्क असणार नाही.