Home Breaking News जळगावच्या भडगावमध्ये प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ

जळगावच्या भडगावमध्ये प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ

0
जळगावच्या भडगावमध्ये प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ

जळगावच्या भडगावमध्ये प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : जळगाव – जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील वाडे येथे प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी सकाळी समोर आली असून मुकेश सोनवणे (22) आणि नेहा ठाकरे (19) अशी मृतांची नावे असून दोघेही वाडे गावातील रहिवासी होते. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

वाडे गावातील माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीतील वरच्या मजल्यावर जिन्यात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन या प्रेमीयुगुलाने जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवारी सकाळी उजेडात आल्यानंतर पोलीस पाटील अरविंद पाटलांनी भडगाव पोलिसांना घटनेची माहिती कळवली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह तत्काळ वाडे गावात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश आणि नेहा हे एकाच समाजाचे असून दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, समाजाकडून प्रेमाला मान्यता मिळणार नाही. या भीतीपोटी दोघांनी टोकाचे पाऊल उलचत जीवनयात्रा संपवली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.