मीराबाई चानू झळकणार मोठ्या पडद्यावर, मणिपुरी भाषेत येणार बायोपिक

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11805*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

119

मीराबाई चानू झळकणार मोठ्या पडद्यावर, मणिपुरी भाषेत येणार बायोपिक

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – ‘टोकयो ऑलिम्पिक 2021’ मध्ये सिल्वर मेडल जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने सर्वच भारतीयांचं मन जिंकलं आहे. तिच्यावर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आत्ता अजून एक आनंदाची माहिती समोर आली आहे. मीराबाई चानूवर लवकरच एक चित्रपट बनवला जाणार आहे. हा चित्रपट मणिपुरी भाषेत बनवण्यात येणार आहे. यासंबंधी काल मीराबाईच्या राहत्या घरी इम्फाळच्या नोगपोक काकचिंग या गावी इम्फाळच्या सेऊती फिल्म प्रोडक्शनतर्फे एक करारावर हस्ताक्षर घेण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती निर्माण कंपनीचे अध्यक्ष मनाओबी एम एमकडून जाहीर करण्यात आली आहे.

तसेच त्यांनी सांगितलं आहे, की ‘मीराबाई चानूवर बनणारा हा चित्रपट इंग्लिश आणि विविध भारतीय भाषेतदेखील डबिंग केला जाणार आहे. आत्ता आम्ही अशा मुलीचा शोध सुरु केला आहे. जी मीराबाई चानूच्या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकेल. ती दिसायला जवळजवळ मीराबाईसारखी हवी. त्यानंतर तिला तिच्या जीवनशैलीबद्दल प्रशिक्षण दिलं जाईल’.

पुढे त्यांनी म्हटलं आहे, ‘या चित्रपटाचं शुटींग सुरु होण्यासाठी अजून 6 महिन्यांचा कालावधी लागेल. यामार्फत दाखविण्यात येईल की, मीराबाई चानूने कसं दिवसरात्र एक करून, आतोनात मेहनत घेऊन आणि आपल्या सर्व खाजगी अडचणी सोडून कष्ट केले, आणि देशासाठी मेडल मिळवलं’.