नवीन रेल्वे उड्डाणपूलामूळे मध्य व उत्तर नागपुरातील    वाहतूक कोंडी सुटणार  – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन 

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11770*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

238

नवीन रेल्वे उड्डाणपूलामूळे मध्य व उत्तर नागपुरातील वाहतूक कोंडी सुटणार 

– केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन 

महारेलद्वारे बांधल्या जाणाऱ्या नागपुरातील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमीपूजन गडकरींच्या हस्ते संपन्न

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर – नागपूर पासून वडसा, भिवापूर, नागभीड ,ब्रह्मपुरी या ठिकाणांना जोडण्यासाठी ब्रॉडगेजचे काम चालू आहे. या मार्गामुळे डब्ल्यूसीएल तसेच चंद्रपूर येथील कोळसा खाणीतून होणाऱ्या वाहतुकीला गती मिळणार आहे. मध्य आणि उत्तर नागपुरातील वाहतुकीमुळे होणारी अडचण सुद्धा कडबी चौक ते गोळीबार चौक इथल्या रेल्वे उड्डाणपूलामुळे होणार नाही,  असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केले . विद्यापीठ कॅम्पस ते आरटीओ तसेच वाडी येथील उड्डाणपुलाची सुद्धा भूमिपूजन लवकर होईल , असेही त्यांनी सांगितले .

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड – महारेल या महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाव्दारे नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौक दरम्यान नवीन उड्डाणपुलाचे तसेच नागपूर इतवारी ते नागभीड रेल्वे लाईन वरील चार नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते.   राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण दूरस्थ प्रणालीद्वारे  तर  नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार कृपाल तुमाने याप्रसंगी उपस्थित होते.

 गोळीबार चौक दरम्यान नवीन उड्डाणपुलाची लांबी 2.82किलोमीटर असून प्रकल्पाची किंमत 146 कोटी आहे.महारेलला केंद्रीय रस्ते निधीतून या कामासाठी निधी देण्यात आला असून नागपूरच्या सर्वच  भागात बनणाऱ्या  अशाप्रकारच्या  उड्डाणपुलामुळे अतिक्रमणाची समस्या सुटणार आहे असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जवळ आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे बांधकाम चालूच आहे . नैसर्गिक आपत्तीमध्ये रस्ते पूल हे खचून जाऊ नये यासाठी रस्त्याचे बांधकाम मजबूत करण्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्रालयाची तांत्रिक मदत आपल्याला लागेल असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी याप्रसंगी नागपूर इतवारी ते नागभीड दरम्यान ब्रॉडगेज कन्व्हर्शन एलेक्ट्रिफिकेशन चे कामे हे 1,400 कोटी रुपयांच्या तरतुदीने पुणे होत आहेत  या मार्गामुळे उमरेड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा वाहतूकीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे . .या रेल्वे मार्गाची लांबी 116 किलोमीटर असून हे बांधकाम डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण होईल असे सांगितले .महारेल तर्फे राज्यात विविध ठिकाणी 90 पूल उभारण्यात येत असून त्यापैकी सर्वाधिक 30 उड्डाणपूल हे विदर्भात आहेत .

या कार्यक्रमाला रेल्वेचे अधिकारी , स्थानिक लोकप्रतिनीधी, नागरिक उपस्थित होते.