
वार्धक्याच्या वाटेवर
सात जन्माची ही गाठ
राहू असे बरोबर
वार्धक्याच्या वाटेवर
साथ हवी खरोखर
क्षण सुखाचे दुःखाचे
भोगूनही झाले खूप
उतरत्या वयामध्ये
झाले कसे एकरूप
एकमेका हो आधार
कृश देहाचे सांगाडे
पाय असूनही देवा
शक्तीहीन हे लंगडे
दिला पिलांनाही जन्म
गेली उडून पाखरे
जीव थकलेले आता
डोळे शोधती लेकरे
कलयुगी जीवनाच्या
वाटेवरी वाटसरू
गेली सोडूनही पिल्ले
जीव आमचे आवरू
देवा नको फोडू जोडी
राहू दे अशीच गोडी
अंती वासरांची साथ
मिळू दे रे बाबा थोडी
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:- बार्शी
जिल्हा :- सोलापूर
9505237081

