Home Breaking News भगतसिंगांची भूमिका करणाऱ्या मुलाचा गळफास लागून मृत्यू

भगतसिंगांची भूमिका करणाऱ्या मुलाचा गळफास लागून मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11760*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

166 views
0

भगतसिंगांची भूमिका करणाऱ्या मुलाचा गळफास लागून मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :लखनऊ –  येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या देशभक्तीपर कार्यक्रमासाठी सराव करताना एका ९ वर्षीय शिवम नावाच्या मुलाला गळफास लागल्‍याने मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये घडली आहे. भगतसिंग यांच्या फाशीच्या घटनेची तालीम सुरू असताना ही हृदयद्रावक घटना घडली.

देशभक्तीपर कार्यक्रमासाठी रंगीत तालीम सुरू होती. त्यावेळी शिवम हा शहीद भगतसिंग यांच्या फाशीच्या घटनेची रंगीत तालीम करत होता.तो रंगीत तालीम करण्यासाठी स्टूलवर चढला होता.त्याने गळ्याभोवती दोरी अडकल्यानंतर अचानक खालील स्टूल घसरला.त्यामुळे त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास घट्ट झाला. सराव करत असताना त्याच्यासोबत अन्य मुलेही होती. ती त्याला मदत करु शकली नाहीत. दरम्यान या घटनेत शिवमचा मृत्यू झाला.मुलाच्या कुटुंबीयांकडून ही घटना अपघाताने घडली असल्याचे सांगत कुणाविरुद्धही तक्रार दाखल केलेली नाही.

कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना न कळविता मुलावर अंत्यसंस्कार केले.