Home Breaking News परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक खंडणीखोरीचा गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक खंडणीखोरीचा गुन्हा दाखल

0
परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक खंडणीखोरीचा गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक खंडणीखोरीचा गुन्हा दाखल

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील खंडणीखोरीच्या आरोपाचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. परमबीर सिंह यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरोधात खंडणी वसुल केल्याची आणखी एक तक्रार दोघा क्रिकेट बुकींनी दाखल कली आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात सोलू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या क्रिकेट बुकींनी एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन परमबीर सिंह आणि त्यांच्या पथकाने कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुल केल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

परमबीर सिंह आणि त्यांच्या तत्कालीन खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांविरोधात काल गुरुवारी जलान याने याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर यापूर्वीही खंडणीचा आरोप आहे. त्यानंतर आता क्रिकेट बुकींनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे नगर पोलिसांनी आता पुन्हा केतन तन्ना आणि सोनू जलान यांना बोलावले आहे. आता ठाणे पोलिस काय पाऊल उचलणार हेच पाहणे गरजेचे आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.