Home Breaking News वणी तालुक्यातील शाळेच्या प्रांगणात वाघाचे ठसे,गावकऱ्यांमध्ये घबराट

वणी तालुक्यातील शाळेच्या प्रांगणात वाघाचे ठसे,गावकऱ्यांमध्ये घबराट

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11751*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

79 views
0

वणी तालुक्यातील शाळेच्या प्रांगणात वाघाचे ठसे,गावकऱ्यांमध्ये घबराट

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,यवतमाळ – जिल्ह्यातील वणी तालुक्यातील साखरा-दरा या गावातील चक्क शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. साखरा-दरा येथील आदर्श शाळेच्या प्रांगणात हे वाघाच्या पायाचे ठसे आढळले. ही भयभीत करणारी घटना परवा दुपारी शिक्षकांच्या निदर्शनास आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.त्यामुळे परिसरात होत असलेल्या वाघाच्या मुक्तसंचारामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे तर नागरिक भयभीत झाले आहे. वाघाच्या पायाचे ठसे आढळताच शिक्षकांनी याबाबत लगेच ग्रामस्थांना कळवले.तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या गंभीर बाबीची कल्पना देण्यात आली. मात्र या घटनेला २४ तास लोटल्यावरही वनविभागाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याचे सौजन्य दाखवले नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
दरम्यान,वणी उपविभागात सातत्याने वाघांचा मुक्तसंचार सुरू असतो. झरीजामनी तालुक्यातील पिवरडोल या गावातील अविनाश पवन लेनगुरे या १७ वर्षीय तरुणावर नुकताच वाघाने हल्ला केला होता. अशा घटना या परिसरात नेहमीच घडताना दिसत आहे. वाघाने अनेक व्यक्तींना जायबंदी तर जनावरांचा फडशा पाडला आहे.वनविभागाने तातडीने मुक्तसंचार करणाऱ्या त्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे