आम आदमी पार्टी नागपूर तर्फे “डेंग्यू मलेरिया ला देउ या मात, आप देईल आपल्याला साथ” अभियान सुरू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11745*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

255

आम आदमी पार्टी नागपूर तर्फे “डेंग्यू मलेरिया ला देउ या मात, आप देईल आपल्याला साथ” अभियान सुरू

विदर्भ तवन,नागपूर-आपल्या नागपूर मध्ये गेल्या काही दिवसापासून डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डेंग्यू आजाराच्या प्रकोपाने हजारो नागपूरकर आजारी पडत आहे. तेव्हा डेंग्यू आजाराचा परादुर्भाव रोकण्यासाठी आम आदमी पार्टी नागपूर तर्फे “डेंग्यू मलेरिया ला देण्याची मात आप देईल आपल्याला साथ” हे जनहिताचे अभियान राबविण्यात येत आहे.


मध्य नागपूर प्रभाग १८ सिरसपेठ, वकिलपेठ, दर्शन कॉलनी, पारडी, गोळीबार चौक, मानेवाडा सहित संपूर्ण नागपूर मध्ये आम आदमी पार्टी चे सेवादार कार्यकर्ते घरो घरी जाऊन डेंग्यू नाशक फवारणी, फॉगींग करून डेंग्यू आजारापासून बचाव करण्यासाठी जनजागृती करत आहेत…
संपुर्ण नागपूर मध्ये लाखो जनतेच्या सुरक्षेसाठी आम आदमी पार्टी च्या या डेंग्यू विरूद्ध लढ्यात मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आव्हाहन आप युवा आघाडी राज्य समिती सदस्य सौ. कृतल पियुष आकरे यांच्या तर्फे करण्यात आले आहे..

आम आदमी पार्टीच्या या डेंग्यू विरूद्ध लढ्याला घरो घरीपोहोचवण्यासाठी आप युवा आघाडी विदर्भ संयोजक श्री. पियुष आकरे, सौ. कृतल आकरे, प्रतीक बावनकर, मंगेश दिवटे, गिरीश तितरमारे, बबलू मोहाडीकर, अक्षय दुपारे, सौ. विषाखा दुपारे, कुणाल ढाकरे, पार्थ मिरे, अनुप खड्डकर, सह आम आदमी पार्टी चे समस्त सेवादार कार्यकर्ते सहभागी आहेत.