आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11739*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

187

आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

विदर्भ वतन,उमरेड : आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते २५१५, ३०५४, आमदार निधी, खनिज विकास निधी, तीर्थक्षेत्र, जन सुविधा, जिल्हा वार्षिक, अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास या कामांचे उमरेड तालुक्यामध्ये भूमिपूजन करण्यात आले.
दि. 30 जुलै रोज शुक्रवारला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांचा हस्ते २५१५, ३०५४, आमदार निधी, खनिज विकास निधी, तीर्थक्षेत्र, जन सुविधा, जिल्हा वार्षिक, अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास कामाचे भूमिपूजन ठाणा, क-हाडंला, तिरखुरा, सेव, वानोडा, देणी, आंबोली, पिरावा, ठोंबरा, गावसुत, ब्राम्हणी, आपतूर, सालई, अकोला, पिपळा, बारव्हा, निरव्हा, खैरी नागोबा, बोरगाव कलांद्री, वडेगाव, विरली, उदासा, हेटी, उकरवाही, वेलसाखरा, पारडगाव, सायकी, तिखाडी, परसोडी येथे भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व सर्व संबधित अधिका-यांना उरलेल्या कामांच्या प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

भूमिपूजन समारंभास सभापती समाजकल्याण नेमावली माटे, रमेश किलनाके सभापती पं. स. उमरेड,जि. प. सदस्य सुनिता ठाकरे, माधुरी गेडाम, वंदना बालपांडे,मिलींद सुटे, प.स.सदस्य प्रियंका लोखंडे, गितांजली नागभिडकर, जयश्री देशमुख, पुष्कर डांगरे, दादाराव मांडस्कर माजी जि. प. सदस्य पद्माकर कळू, दिलीप भोयर, सुभाष मुळे, शिवदास कुकळकर, विश्व्जीत थुल, संजय ठाकरे, अरुण बालपांडे, माजी प.सं. सदस्य सुरेश लेंडे, शालु गिल्लुरकर, अध्यक्ष सं.गा.नी.योजना जितेंद्र गिरडकर, विलास दरणे, सुधाकर कळू, संजय वाघमारे, नागसेन निकोसे, अमोल गेडाम, सतीश नागभीडकर, तसेच सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.