अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद ट्रस्टची पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11729*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

256

अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद ट्रस्टची पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :कोल्हापूर – अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट पूरग्रस्तांना घरबांधणीसाठी 10 कोटींची मदत करणार असून आज बुधवारी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोल्हापूरच्या गारगोटी आणि कुर या भागात पुरामुळे नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली, तसेच त्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा ऐकून त्यांना धीर दिला.

एका महिलेने दिपाली भोसले सय्यद यांना आपल्या घराची दुर्दशा दाखवली आणि रडत रडत आपल्या नुकसानीची व्यथा त्याच्यासमोर मांडली. त्यावेळी या महिलेचे अश्रू आपल्या हाताने फुसत दिपाली म्हणाली की, रडू नकोस रडू नकोस, संकटकाळात धीर सोडू नकोस, अशाच पद्धतीने पुरग्रस्तांचे दिपालीने सांत्वन केले.

दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2018 साली आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी दिपाली भोसले सय्यद पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आली होती. ती आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल पाच कोटी रुपयांची मदत उभी केली होती.