Home Breaking News अनिल देशमुखांच्या याचिकेवर 3 ऑगस्टला होणार सुनावणी

अनिल देशमुखांच्या याचिकेवर 3 ऑगस्टला होणार सुनावणी

0
अनिल देशमुखांच्या याचिकेवर 3 ऑगस्टला होणार सुनावणी

अनिल देशमुखांच्या याचिकेवर 3 ऑगस्टला होणार सुनावणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थानवी दिल्ली- मनी लॉँड्रींग प्रकरणी ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता सुप्रीम कोर्टाने देशमुखांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. तसेच या याचिकेवर येत्या 3 ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार असल्याचे निश्‍चित केले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर बार मालकांकडून वसुली केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांनंतर देशमुख यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ईडीकडून अनेकदा देशमुख यांना समन्स बजावण्यात आले. मात्र देशमुखांनी चौकशीला न जाता ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या मनी लॉँड्रींगप्रकरणी सुरक्षेची मागणी करत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने देशमुखांच्या ईडी मार्फत दंडात्मक कारवाई न करण्याच्या याचिकेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. यासोबत सुप्रीम कोर्टाने मनी लॉड्रिंग अंतर्गत कारवाईवर रोख लावण्याच्या मागणीस नकार दिला आहे. तसेच दुसर्‍या पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय हा आदेश जारी करू शकत नाही. आम्ही इतर प्रकरणात दंडात्मक कारवाईवर रोख लावली नसून पण एखाद्या प्रकरणात अशा प्रकारे आदेश देणे अन्यायकारक असेल, असे सांगत सुप्रीम कोर्टाने याचिकेची सुनावणी 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.