घराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11699*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

570

घराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे

-हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज

विदर्भ वतन,मुंबई- राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने सर्वत्र विश्रांती घेतली आहे. मात्र आता हवामान विभागाने (कटऊ) येत्या चार पाच दिवसात पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन तासात पुण्यासह ठाणे, रायगड जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील चार दिवस (२९, ३० ३१ जुलै आणि १ आॅगस्ट ) राज्याच्या किनारपट्टी भागात आज सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस
मध्य महाराष्ट्रातही ब-यााच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान दि ३०, ३१ जुलै आणि १ आॅगस्ट रोजी विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस बरसण्याबरोबरच तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.