९ आॅगस्टच्या आंदोलनात पूर्व नागपूर येथून शेकडो विदर्भवादी कार्यकर्ते सामील होणार – विराआस

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11691*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

133

९ आॅगस्टच्या आंदोलनात पूर्व नागपूर येथून शेकडो विदर्भवादी कार्यकर्ते सामील होणार – विराआस

विदर्भ वतन,नागपूर- दि. २७ जुलै ला विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे पूर्व नागपूर विधानसभेतील शांतीनगर येथे रंजना लक्ष्मण दुर्गे यांच्या घरी सायंकाळी ४ वाजता बैठक घेण्यात आली. तसेच मध्य नागपूर येथे भुतेश्वर नगर गंगाबाई घाट येथे ६:३० सायंकाळला मनोज कुकडकर यांच्या निवासस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक पार पडली.
९ आॅगस्ट ला होणा-या बेमुदत ठिय्या आंदोलनात सामील होण्या संबंधी व मोठया प्रमाणात महावितरण कंपणीद्वारे वीज कनेक्शन काटत असल्यास कश्याप्रकारे थांबवण्यात येईल यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
बैठकीला विराआस युवा आघाडी विदर्भ प्रदेशाध्यक्ष मुकेश मासूरकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले की वीज विदर्भात तयार होते. विदभार्तील जनतेचे वीजेवर पहिले हक्क आहे. विदर्भातील जनतेवा होणा-या शोषणाच्या विरोधात आता जन आंदोलनात सामील झालेच पाहिजे अन्यथा विदभार्चे शोषण सुरुच राहणार. बेरोजगारी वर बोलायला कोणताच विदर्भातील नेता बोलायला तयार नाही. म्हणून विदभार्चे राज्य निर्माण झाल्याशिवाय युवकांचे भविष्य बनूच शकत नाही. म्हणून युवकांनी विदर्भाच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे असे आढावा बैठकीत सांगण्यात आले.

तसेच नागपूर शहर महासचिव नरेश निमजे, वाहतूक आघाडी नागपूर जिल्हा प्रशांत जयकुमार, कोअर कमिटी सदस्या सुनिता येरणे , नागपूर शहर उपाध्यक्ष प्यारुभाई ऊर्फ नौशाद हुसैन यांची भाषणे झाली.

बैठकीला नागपूर शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्षा वीणा भोयर, असलम शेख, मीना लारोकर, कनिजा कुरेशी, सुनिता दुर्गे, पार्वती गोयल, पायल तुमाने, मुमताज बानो, सीमा गोमासे, सुनिता कुकडकर, प्रतिक्षा बोरेकर, सोनु वाघमारे, अश्विनी वाघमारे, सरिता वाघमारे, ऋषी भारती, इंदिरा सातनुरकर, मोरेश्वर बनकर, हिमाणी कुकडकर, आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.