मनपा आयुक्त राधाकृष्णन बी़ यांनी केलेल्या कारवाईविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

324

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – २५ जुलै रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश पांडव यांच्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य शिबिराचे आयोजन मानेवाडा रोड येथील सिध्देश्वर सभागृहात करण्यात आलेले होते़ या आरोग्य शिबिराची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बँनर परिसरात लावलेले होते़ मात्र आदल्या दिवशी रात्री २ वाजता मनपाच्या अतिक्रमण विभागाने बँनर काढण्याची कारवाई केली़
ही कारवाई मनपा आयुक्तांच्या सांगण्यावरून एकतर्फी करण्यात आली असा आरोप युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेला आहे़ यानिमीत्ताने युवक काँग्रेसच्यावतीने नागपूर मनपा कार्यालयात राधाकृष्णन बी़ यांच्या विरोधात बुधवारी आंदोलन केले़ धंतोली झोनचे सहाय्यक आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांनी मनपा आयुक्तांच्या सांगण्यावरून कारवाई केल्याचे कार्यकर्तांना सांगितले़़ याचा जाब विचारण्याकरिता आज कार्यकर्ते मनपाच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले़ यावेळी त्यांनी आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना पोलिस कर्मचाºयांमार्फत आत प्रवेश दिल्या गेला नाही़ त्यामुळे त्यांनी कार्यालय परिसरात ठिय्या मांडून आंदोलनाला सुरूवात केली़
यावेळी काही प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व पोलिस कर्मचाºयांमध्ये शाब्दीक चकमकही पहायला मिळाली़ त्यामुळे काही काळ मनपा कार्यालय परिसरात तणावाची स्थिती होती़ काही वेळानंतर मनपा आयुक्तांमार्फत आंदोलकांमधून ५ लोकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली़ या संपुर्ण प्रकरणाची आपण चित्रफितही तयार केलेली आहे व ती मनपा आयुक्तांना दाखवून जाब विचारायचा आहे असे आंदोलक कार्यकर्त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले़
काँग्रेसच्या बँनरवर गिरीश पांडव यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे छायाचित्र लावण्यात आलेले होते, तसेच जेथे काँग्रेसचे बँनर लावण्यात आले तेथे वरच्या बाजुला भाजपचे सुद्धा बँनर लावण्यात आलेले होते़ मात्र मनपा कर्मचाºयांनी फक्त रात्री २ वाजता कारवाई करीत फक्त काँग्रेसचे बँनर जप्त केले़ तसेच मनपा आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई झाली, त्यामुळे मनपा आयुक्त भाजपचे दलाल आहे का? असा आरोपही यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला़ यावेळी अक्षय हेटे, सुहास नानवटकर, प्रतिक कोल्हे, शत्रुघ्न चंदेल यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागपूर युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते़
————————————-
मनपा आयुक्त भाजपचे अनधिकृत जाहिरात प्रमुख?
आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी श्री़ राधाकृष्णन बी़ हे अनधिकृत जाहिरात प्रमुख भाजपा नागपूर महानगर पालिका यांचे संपर्क कार्यालय चालवित असल्याचा आरोप फलकाच्या माध्यमातून केला़ तसेच यावेळी मनपा आयुक्त भाजपचे कार्यकर्ता असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला़ रविवार सुटीचा दिवस असुनही रात्री २ वाजता मनपा कर्मचाºयांकडून झालेल्या या कारवाईमुळे धंतोली झोनचे सहाय्यक आयुक्त यांच्याही कार्यशैलीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले़ तसेच त्यांनी मनपा आयुक्तांच्या आदेशाचे पालन केल्याचे सांगितले असेही कार्यकर्ते म्हणाले़
————–
मनपाने भाजपचे फलक का नाही हटविले?
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनवेळी उपस्थित पत्रकारांना सांगितले की, दक्षिण नागपूरात मोठ्या प्रमाणात भाजपचे फलक लावलेले आहेत, मात्र ते हटविण्यात आलेले नाही़ तसेच माजी मुख्यमंत्र्यांचेही फलक सर्रासपणे झळकत आहे़ तसेच भाजपची अनेक शिबीरे ही रस्त्याच्याकडेला विनापरवाना सुरू आहे़ त्यामुळे फक्त काँग्रेसच्या फलकांवर कारवाई करणे ही बाब संशयास्पद असल्याचे सांगितले़