
! लोकांचा सल्ला!
किती विचित्र वेळ ही आली
कालच्या टोळीला, आज गर्दी म्हणे,
रहा जरा लांब तुम्ही
दिसताच कुणाला सर्दी म्हणे.
हा साधा सुधा रोग नाही
सर्व रोगांचा हा बाप म्हणे,
सहा फुट तुम्ही अंतर राखा
दिसताच कुणाला ताप म्हणे.
जगभर पसरला हवेत
हा जीवघेणा धूर म्हणे,
कित्येक जिवाचा सडा सांडला
आता तरी जरा दूर म्हणे.
येणार कालची वेळ सुखाची
हरणार आजची वेळ म्हणे,
करू हर्षाने सणवार साजरे
मैदानी होईल खेळ म्हणे.
असो नेहमी मास्क सोबती
राखा स्वताची निगा म्हणे,
संक्रमित व्यक्तीशी जरा
माणुसकीने वागा म्हणे.
राजेश शेषराव पोफारे
रा. सेंदरी ता. देवळी
जिल्हा. वर्धा
9307010387

