Home Breaking News राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11654*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

48 views
0

राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – अश्लील चित्रपट प्रकरणात उद्योजक राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रासह त्याचा सहकारी रायन थार्पलाही अटक झाली होती. त्याचीसुद्धा १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पॉर्नोग्राफी कनेक्शन समोर आल्यापासून राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला. या प्रकरणात १९ जुलै रोजी त्याला अटक झाली होती. त्यानंतर पोलीस कोठडी रद्द करण्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जो कंटेंट पोलीस अश्लील म्हणून दाखवत आहेत तो थेट अश्लील नसून एका विशिष्ट इच्छुक वर्गासाठी तयार केलेल्या शॉर्टफिल्म्स आहेत, असा दावा कुंद्राने केला होता. तसेच पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असून त्याची कायदेशीर पूर्वसूचना देण्यात आली नाही. त्यामुळे महानगर दंडाधिकारींनी दिलेला रिमांडही बेकायदेशीर आहे असा दावा कुंद्राने केला होता. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार लावलेले आरोपही चुकीचे असून त्याप्रमाणे कोणतेही कृत्य आपण केलेले नाही, असा बचाव त्याने याचिकेत केला होता. तर गुन्हे शाखेने कुंद्राला या प्रकरणात मुख्य सूत्रधार दाखवले असून त्याच्या खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते आणि हॉटशॉट्स ऍपच्या माध्यमातून अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते प्रदर्शित करणे हा प्रकार चालविला जात होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी राजच्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळत राजला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी न्यायालयाने राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले होते. यादरम्यान मुंबई पोलिसांची टीम राजला घेऊन त्याच्या घरी झाडाझडतीसाठी पोहोचली होती. तसेच या प्रकरणात त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचीही चौकशी झाली होती.