Home इतर मागासवर्गीयांच्या वस्तुनिष्ठ माहितीसाठी सहकार्य करावे : चंदलालजी मेश्राम

मागासवर्गीयांच्या वस्तुनिष्ठ माहितीसाठी सहकार्य करावे : चंदलालजी मेश्राम

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11640*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

45 views
0

मागासवर्गीयांच्या वस्तुनिष्ठ माहितीसाठी सहकार्य करावे : चंदलालजी मेश्राम

-राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल पवनी येथे सत्कार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,पवनी : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य चंद्रालालजी मेश्राम निवृत्त न्यायाधीश शासकीय कामकाजाकरिता नागपूर चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर असतांना पवनी येथे मागासवर्गीय यांच्या प्रश्नावर चर्चासत्र व मागासवर्गीय आयोगावर नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार कार्यक्रम पवनी मच्छी उत्पादक सह.संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विकास राऊत, भंडारा जिल्हा मत्स्यव्यवसाय सह. संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे,पवनी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर तेलमासरे, भंडारा जिल्हा काँग्रेस प्रसार मध्यम प्रमुख अशोक पारधी,पवनी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर उरकुडकर,भंडारा जिल्हा ओबीसी महिला महासंघ अध्यक्षा शोभना गौरशेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी राज्य मागासवर्गीय आयोग लवकरच ओबीसी समाजाची जणगणना करण्याची प्रक्रिया सुरू करणार असून ओबीसी बांधवांनो आयोगाला वस्तुनिष्ठ माहितीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य चंदलालजी मेश्राम यांनी केले. पवनी मच्छी उत्पादक सह. संस्था, पवनीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झाल्याबद्दल माजी न्यायाधीश चंद्रलालजी मेश्राम यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
मेश्राम पुढे म्हणाले, राज्यातील ओबीसी प्रवगार्तील जातीनिहाय जनगणना करून राज्यात ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणासाठी कार्य करण्याची जबाबदारी आयोगाची असून यासाठी सर्व ओबीसी समाज बांधवांनी सहकार्य करावे, असे मत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर शिवरकर, संचालक दामोधर नागपुरे,धनराज नागपुरे,नामदेव शिवरकर,कैलास तुमसरे, प्रभाकर नान्हे,फागो दिघोरे, मोरेश्वर नागपुरे, मनोहर पचारे,अंजनाबाई शेंडे,रुखमाबाई नागपुरे,रमेश शिवरकर,मनोज केवट, गोविंद मखरे, रुपेश भानारकर,माधव मानकर,अंगत शिवरकर राजेश नागपुरे,गुरुदास नागपुरे,मेश्राम सर मानकर सर,राजू तुमसरे,लीलाधर शिवरकर,अक्षत नंदरधने,सुलोचना शिवरकर आणि मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एनएसयुआयचे तालुका अध्यक्ष महेश नान्हे तर प्रास्ताविक प्रकाश पचारे यांनी केले.