
भारताचा विक्टरी पंच जगाला दाखवण्याची सर्वोत्तम संधी- क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण
पत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने कोरोना काळातील आॅलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी या विषयी वेबिनारचे आयोजन
विदर्भ वतन,नागपूर-टोक्यो आॅलिम्पिकचे बिगूल वाजले आहे. आज होणा-या उद्घाटनापासून प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होत आहे. या निमित्ताने पत्र सूचना कार्यालय आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या वतीने कोरोना काळातील आॅलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी या वेबिनारचे आयोजन केले होते. टोक्योमध्ये वार्तांकनासाठी गेलेले क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण, न्यूज डंका पोर्टलचे सहायक संपादक महेश विचारे आणि मुक्त पत्रकार शैलेश पाटील यांनी वेबिनारमध्ये सध्याची कोरोना परिस्थिती आणि भारतीय क्रीडापटुंना पदक जिंकण्याची असलेली संधी आदी विषयावर भाष्य केले.
टोक्योमध्ये खेळाडूंच्या आरोग्याची अतिशय योग्य काळजी घेतली जात आहे. यासाठी खेळाडूंचेही पूर्ण सहकार्य मिळत आहे. कोरोना काळात एकत्र येत एकमेकांना धीर देण्याची शिकवणूक खेळाडूंनी जोपासली आहे असे तिथल्या प्रत्यक्ष स्थिती विषयी संदीप चव्हाण यांनी सांगितले. अतिशय आव्हानात्मक काळात स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीकडे पूर्वीच्या निकषांप्रमाणे पाहू नये, असे आवाहन संदीप चव्हाण यांनी केले.
आॅलिम्पिकमध्ये जय-पराजयाला फारसे महत्त्व नाही, तर तुम्ही कशी लढत देता हे महत्त्वाचे आहे आणि यंदा मोठ्या संख्येने या स्पधेर्साठी पात्र ठरलेल्या खेळाडूच्या संख्येने ते सिद्ध झाले आहे असे सांगत भारताचा विक्टरी पंच जगाला दाखवण्याची ही सर्वोत्तम संधी असल्याचे चव्हाण म्हणाले .
पत्र सूचना कार्यालय,मुंबई येथील सोनल तुपे यांनी वेबिनारच्या संवादकची भूमिका बजावली. प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांची निर्मिती असलेल्या क्योटो आॅलिम्पिक स्फूतीर्गीताने या वेबिनारची सांगता झाली.

