Home नागपूर महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या सभेत विविध मुद्यांवर चर्चा

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या सभेत विविध मुद्यांवर चर्चा

0
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या सभेत विविध मुद्यांवर चर्चा

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या सभेत विविध मुद्यांवर चर्चा

विदर्भ वतन,उमरेड : महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनची सभा जीवन विकास विद्यालय व ज्युनिअर कॉलेज उमरेड येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष शिवराम घोती, राज्य कोषाध्यक्ष गजानन टांगले, नागपूर विभाग अध्यक्ष यशवंत कातरे, नागपूर विभाग उपाध्यक्ष प्रविन भोंगे, जिल्हा कोषाध्यक्ष केशवानंद बमनोटे व कुही तालुका अध्यक्ष मून हे उपस्थित होते. सभेमध्ये उमरेड कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. नागपूर जिल्हाध्यक्ष कोहिनूर वाघमारे यांची निवड करण्यात आली. त्यांना नियुक्ती पत्र राज्य अध्यक्ष शिवराम घोती यांनी दिले.
उमरेड तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली. त्यामध्ये उमरेड तालुकाअध्यक्ष विजय माजरीकर, सचिव बाबा मेश्राम, उपाध्यक्ष संजय चाचरकर, कार्याध्यक्ष अंकेश्वर ठाकरे, कोषाध्यक्ष देवतळे,तालुका मुख्य संघटक विवेक गजघाटे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष कोहिनूर वाघमारे यांनी केली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जगदीश लडके यांची नियुक्ती करण्यात आली. सभेला रामकृष्ण ठाकरे सर, नरेंद्र पिपरे सर, गोवर्धन बुटे सर, सुदर्शन अंगडलवार सर, स्वप्निल गवळी सर,उमेश मोटघरे, संदीप रामटेके, प्रणय मेश्राम, शेखर गेडाम, सुधीर वाघ,डांगे सर,शिरपूरकर सर,तुरारे सर, संतोष ताजने, चीत्रिव सर,सेलोटे सर महिला प्रतीनीधी जाधव मॅडम, आसटकर मॅडम ,राउत मॅडम व इतर शिक्षक, शिक्षीका उमरेड , भिवापूर, आणि कुही तालुक्यातील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.