Home Breaking News स्थलांतरितांचा तो सागरी प्रवास ठरला अखेरचा

स्थलांतरितांचा तो सागरी प्रवास ठरला अखेरचा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11617*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

78 views
0

स्थलांतरितांचा तो सागरी प्रवास ठरला अखेरचा

स्थलांतरितांची बोट बुडून ५७ जणांचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :नवी दिल्ली – युरोपात चांगल्या जीवनशैलीसाठी स्थलांतरीत होणाऱ्या नागरिकांसोबतची दुर्घटना समोर आली आहे. आफ्रिकन स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट लिबियाच्या समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये किमान ५७ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दक्षिण किनारपट्टीला लागून असलेल्या खूममधून ही बोट रविवारी निघाली होती. या बोटीवर महिला आणि लहान मुलांसह ७५ जण होते. या दुर्घटनेत ज्या ५७ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी २० महिला असून २ लहान मुलं असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत संघटनेकडून देण्यात आली आहे. या दुर्घटनेमधून १८ जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांना किनाऱ्याकडे पाठवण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. या वाचलेल्यांपैकी काही जण नायजेरिया, घाना आणि गँबिया भागातले आहेत. त्यांनी सांगितलेकी, इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही बोट मधेच बंद पडली आणि वातावरण खराब असल्याने ती बुडाली. गेल्या आठवड्यातली बोट बुडाल्याची ही दुसरी दुर्घटना आहे. यापूर्वीही स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट बुडाली होती, ज्यात किमान २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती.