प्रेमाच्या नावावर केला व्यभिचार, युवती गर्भवती होताच दिला लग्नास नकार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11586*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

165

प्रेमाच्या नावावर केला व्यभिचार,
युवती गर्भवती होताच दिला लग्नास नकार

विदर्भ वतन,नागपूर-प्रेयसीवर वारंवार अत्याचार करून वेळेवर लग्नास नकार देणा-या पीडब्लूडीमधील वर्ग एकच्या अधिका-यावर प्रेयसीवर अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी अधिका-याने युवतीचा बळजबरी गर्भपातही करविला. हितेश अशोक महाजन (२६), असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी हितेश महाजन आणि २४ वर्षांची युवती एकाच गावात शेजारी-शेजारी राहतात. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. हितेशला सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिका-याची नोकरी लागली. त्यामुळे हितेश जरीपटका हद्दीतील जागृतनगर येथे किरायाने घर घेऊन राहू लागला होता. त्याच्या प्रेयसीला नागपुरात खासगी रुग्णालयात नोकरी लागल्याने ती ही नागपुरात रहायला आली. प्रेमसंबंध असल्याने दोघेही सोबत वेळ घालवू लागले होते. त्याने युवतीला लग्नाचे आमिष देऊन वारंवार तिच्यावर अत्याचार केला. यामुळे पीडित युवती गर्भवती झाली होती. पण, बहिणीचे लग्न झाल्यावर लग्न करू, असे आश्वासन देत हितेशने बळजबरी तिचा गर्भपात करविला.

हितेशच्या आई-वडिलांनाही याबाबत कळले. त्यावेळी त्यांनीही पीडित युवतीला हितेशशी लग्न करून देणार असल्याचे सांगितले होते. ३ जुलैला पीडित युवतीचे आई-वडील लग्नाची बोलणी करण्यासाठी हितेशच्या आई-वडिलांना भेटायला गेले होते. पण, त्यावेळी हितेशने युवतीशी लग्न करण्यास नकार दिला. युवतीच्या आई-वडिलांनी हितेशला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने लग्न करण्यास साफ नकार दिला. त्यामुळे व्यथित झालेल्या युवतीने जरीपटका पोलिस ठाण्यात आरोपी हितेशविरुद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.