पंचवटी नगर,जयताळा येथे सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करावी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11581*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

154

पंचवटी नगर,जयताळा येथे सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करावी
– नागरिकांची मागणी

विदर्भ वतन, नापूर-पंचवटी नगर प्रभाग क्र. 38 जयताळा येथे इंजीनियर व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आम जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रभागातील नागरिकांच्या घरातील सांडपानी वाहून नेण्यासाठी नियोजन नसल्यामुळे ते परिसरातील लोकांच्या घरासमोरच जमा होत आहे. त्यामुळे दुर्गंधी व गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरातील सांडपाणी लोकांच्या घरासमोर जमा न होता ते वाहून जाण्यासाठी योग् उपाययोजना करावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे. मात्र मनपा प्रशासन व नगरसेवक इकडे कानाडोळा करीत आहे.