
हिंदूंच्या मुलींचे लग्न मुस्लिम युवकांसोबत लावा, कोण मधात येतो ते मी बघतो – राज्यमंत्री बच्चू कडू
विदर्भ वतन,नाशिक- शहरातील एका बड्या व्यावसायिकाची कन्या आणि परधर्मीय वर यांच्या रद्द झालेल्या विवाहाची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती . लव्ह जिहादचा आरोप होत असलेल्या या लग्नांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे . तसंच , वधु – वर व त्यांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली आहे.नाशिकमधील एका विवाह सोहळ्याची चर्चा रंगली होती . मुलगी हिंदू व मुलगा मुस्लिम असल्यानं या लग्नाला लव्ह जिहादचा रंग देण्याचा प्रयत्न काही कथित धर्मरक्षकांनी केला होता . वाढता विरोध व दबाव पाहता हा विवाह सोहळा स्थगित करण्यात आला होता . सोशल मीडियावर या लग्नाची पत्रिकाही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती . या न झालेल्या लग्नाची चचार्ही नाशकात झाली होती . या सगळ्या घडामोडीनंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या कुटुंबाला पाठिंबा दिला आहे . कोण लग्न थांबवतो ते मी बघतोच , अशी तंबीच त्यांनी दिली आहे.कोणत्याही गोष्टीला जातीचं वळण लावणं चुकीचं आहे . दोघंही आपापला धर्म कायम ठेवून विवाह करत आहेत . मुलगी आपला धर्म सोडत नाहीये . मुलगा व मुलगी त्या धर्मात राहून विवाह करत असतील तर अडचण काय आहे ?, असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे . दोघांच्या लग्नाला मी दोन दिवस आधीच हजर राहणार आहे आणि नाचणार देखील आहे , असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे . बच्चू कडू यांच्या आश्वासनानंतर या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे . काय आहे नेमकं प्रकरण ?

