बोलेरो गाडी दरीत कोसळून आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू, स्थानिकांकडून बचावकार्य सुरू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :नंदुरबार – तोरणमाळ-सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी बोलेट दरीत कोसळून जागीच आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच, या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गाडी दरीत कोसळल्याने बचाव आणि मदत कार्यालाही अडथळा येत असल्याचं म्हटलं जात आहे. मोबाईलला नेटवर्क नसल्याने बचावकार्यासाठी संवाद साधणं कठीण झालं असून सध्या स्थानिकांकडून बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नंदूरबार येथील तोरणमाळ-सिंदिदिगर या अतिदुर्गम भागात एका बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. प्रवासादरम्यान ही गाडी एका दरीत कोसळली आहे. यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अपघात झाल्याचे समजताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी बाचावकार्य सुरु केले आहे. तसेच स्थानिक पोलीस प्रशासनसुद्धा घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांकडूनसुद्धा बचावकार्य केले जात आहे. ही घटना घडल्याचे समजताच पोलील अधिकक्षकांसह पोलिसांचा आणखी फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला आहे. मात्र, हा भाग अतिदुर्गम असल्यामुळे येथे मोबाईलला नेटवर्क नाही. परिणामी बचावकार्य करण्यास मोठ्या अडचणी येत आहेत.

You missed