
फटकार-३
संकटाची संपलेली लाट नाही
अजूनही भयमुक्त झाली वाट नाही
का तरी घेता परीक्षा या विषाची
अजूनी पुरता जाहला गृहपाठ नाही
मृत्युचे तांडव अजून ताजेच आहे
अंत्यसंस्कारास पुरले घाट नाही
क्रूर आहे जीवघेणा हा विषाणू
घोर आहे युद्ध सारीपाट नाही
हात वरचेवर धुवा अन मास्क लावा
अजूनही पडली यमाशी गाठ नाही
प्रा.जयसिंग गाडेकर
आळे, तालुका – जुन्नर,जिल्हा- पुणे.
भ्रमणध्वनी -९९७०३४१६४६

