‘बालिका वधू’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11538*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

136

‘बालिका वधू’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, ‘बालिका वधू’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे नुकतेच दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. २०१८ मध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर पक्षाघाताचा झटकाही आला होता.

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिखरी या घरीच एका खासगी नर्सच्या देखरेखीखाली राहत होत्या. गेल्या वर्षी कोरोना काळातही त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सुरेखा यांच्या तमस, मम्मो आणि बधाई हो या चित्रपटातील भूमिकांबद्दल त्यांना सलग तीन वेळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. टीव्ही मालिका ‘बालिका वधू’मधील त्यांची दादीसा ही भूमिका लोकांच्या मनात चांगलीच घर करून राहिली होती.