जर्मनी आणि बेल्जियममध्ये पुरामुळे हाहाःकार, 80 जणांचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11533*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

147

जर्मनी आणि बेल्जियममध्ये पुरामुळे हाहाःकार, 80 जणांचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :नवी दिल्ली – विक्रमी पावसामुळे जर्मनी आणि बेल्जियममध्ये नद्यांना पूर आलाय. यात आतापर्यंत 80 जणांचा बळी गेला असून अनेकजण बेपत्ता आहेत. पुरामुळे कालव्यांचे पाणी क्षमतेच्या पलीकडे गेले असून रस्त्यांची नदी झाल्याचे चित्र सध्या जर्मनीत पाहायला मिळत आहे. तसेच अनेकजण बेपत्ता झाल्याचे समजते आहे. पुरामुळे अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. तर काही इमारती कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छतावर अडकलेल्या लोंकाना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. त्यांनी सांगितलं की, येथील गावात घरे कोसळल्यामुळे त्यांना तेथून काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तर अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. पूर आणि दरड कोसळल्यामुळे अनेक गावांचे संपर्क तुटल्याने या भागाचे किती नुकसान झाले हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, जर्मनीत आलेल्या पुराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओंमध्ये रस्त्यावर कार वाहताना आणि काही ठिकाणी घरे अंशत: पत्त्यांसारखी कोसळताना दिसत आहेत. येथे आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम आणि मध्य जर्मनी सोबतच शेजारील देशांचेही अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.