आई बनू न शकल्याने महिलेच्या गुप्तांगावर दिले लोखंडाच्या सळीचे गरम चटके

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11522*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

176

आई बनू न शकल्याने महिलेच्या गुप्तांगावर दिले लोखंडाच्या सळीचे गरम चटके

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :रांची – गर्भधारणा करू न शकल्याने एका महिलेच्या गुप्तांगावर लोखंडाच्या सळीने गरम चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, महिलेच्या कंबरेचा भाग जाळण्याचा प्रकारही करण्यात आला. झारखंडमधल्या गढवा जिल्ह्यातील पार्सपानी गावात ही घटना घडली असून पीडित महिला सध्या रुग्णालयात दाखल आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आरोपी पती दिनेश प्रसाद गुप्ता याच्यासहीत इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

दिनेश गुप्ता याची पत्नी गेल्या १२ वर्षांपासून गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होती. परंतु, वैद्यकीय कारणांमुळे तिला काही अडचणींना सामोरं जावं लागलं. मूल न होऊ शकल्यानं तिला सासरच्या छळालाही सामोरं जावं लागत होतं. गेल्या बुधवारी महिलेला अपत्याला जन्म न देण्यासाठी सर्वात अघोरी शिक्षेला सामोरं जावं लागलं. पती, सासरा तसंच सासरच्या इतर मंडळींनी महिलेचा शरीराचा खालचा भाग तापलेल्या लोखंडी रॉडनं जाळला. यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

सासरच्या मंडळींच्या तावडीतून कशीबशी सुटून जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरल्यानं तिचा जीव वाचल्याचं पीडितेच्या आईनं म्हटलंय. घरातून पळून गेल्यानंतर महिलेनं आपल्या माहेरच्या कुटुंबाशी आणि आई पुष्पांजली देवी यांच्याशी संपर्क साधला. माझ्या मुलीला गेल्या अनेक वर्षांपासून सासरी मारहाण होत होती. त्यांनी गरम रॉडनं तिला जाळण्याचाही प्रयत्न केला. तिनं कशीबशी मला याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही तिला रुग्णालयात दाखल केलं, असं पीडितेच्या आईनं म्हटलंय. तसंच आपल्या मुलीसाठी न्यायाची मागणी केलीय.