छोटे विमान कोसळले; वैमानिक ठार तर प्रशिक्षणार्थी बचावली

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11518*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

159

छोटे विमान कोसळले; वैमानिक ठार तर प्रशिक्षणार्थी बचावली

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थाजळगाव – शिरपूर येथील विमान प्रशिक्षण केंद्राचे विमान डोंगरावर कोसळून एक जण ठार तर महिला प्रशिक्षणार्थी बचावली आहे. ही थरारक घटना वर्डी ता. चोपडानजीक शुक्रवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या छोट्या विमानात पायलट आणि एक महिला प्रशिक्षणार्थी असे दोन जण होते. हे विमान चोपडयापासून दहा किमी अंतरावर वर्डी गावाजवळील सातपुडा पर्वतरांगात असताना अचानक पंखा तुटला. त्यामुळे हे विमान समोरच्या ध्वज बरडी डोंगरावर जाऊन आदळले आणि खाली पडले.

मोठा आवाज झाल्याने काही अंतरावर असलेल्या झोपडीमधील लोक तिकडे धावले. त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करीत जखमी महिलेस बाहरे काढले. ठार झालेल्याचे नाव समजू शकले नाही. चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात असलेला हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या परिसरात दुर्घटना दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. आदिवासी परिसर असल्याने येथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेले. या घटनेची माहिती घेण्यासाठी अधिक तपास करण्यात येत आहे.