लॉकडाउनचे असेही दुष्परिणाम भोगावे लागले, अखेर आजारग्रस्त पत्नीलाच संपवावे लागले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11509*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

496

लॉकडाउनचे असेही दुष्परिणाम भोगावे लागले,
अखेर आजारग्रस्त पत्नीलाच संपवावे लागले

विदर्भ वतन, बल्लारपूर : चंद्रपूर लगतच्या बल्लापूर शहरात गत चार वर्षांपासून मूत्रपिंड व कॅन्सरने ग्रसित असलेल्या पत्नीच्या आजारावर खर्च करण्याची आर्थिक कुवत नसल्याने पतीने स्वत:च्या आजारी पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. पत्नीच्या हत्येनंतर खुनी पतीने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.

शहरातील शिवाजीनगर बी.टी.एस. प्लॉट निवासी काजल डे आपली पत्नी आशा डे (वय ४५) ही कॅन्सर व मूत्रपिंडाच्या आजाराने चार वर्षांपासून ग्रस्त होती. महिन्याकाठी हजारो रुपये खर्च करावे लागत होते. तरीही पत्नीने आजार बरे होऊ शकत नव्हते. काजल डे अगोदर आॅटो चालक होता. त्यांचा मुलगा रवी डे व काजल डे दोघेही नगर परिषदच्या बाजूला ‘रवी चॉयनिज फास्ट फूड सेंटर’ चालवित होते. लॉकडाऊनच्या काळात त्यांचा व्यवसाय ठप्प पडला होता. यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. परिणामी त्यांचे मानसिक संतुलनही बिघडले होते.
बुधवार रात्री आठ ते साडे आठचा दरम्यान आपली पत्नी आशा डे हिला कायमचे संपविण्याचा बेत आखून तिचा गळा आवळून जाग्यावरच हत्या करण्यात आली. आणि सून प्रियंका रवी डे (२८) हिला पण गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने वेळेवरच पोलीस टीम दाखल झाली व दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सून प्रियंकाला चंद्रपूर हलविण्यात आले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. तेव्हा विषाची बॉटल व उलटी केलेले दिसून आले. सुनेने विष प्रासन केले असावे असे प्रत्यक्ष दर्शनिंनी सांगितले. काजल डे याने पत्नीची हत्या करून स्वत: पोलिस ठाण्यात सर्मपण केले. पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली अढक मुलाणी करीत आहे.