पत्नीला निर्वस्त्र करून गावभर फिरविले, पतीच्या दृष्कृत्यात गावकरीही सामील झाले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11504*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

169

पत्नीला निर्वस्त्र करून गावभर फिरविले,
पतीच्या दृष्कृत्यात गावकरीही सामील झाले

वृत्तसंस्था,नवी दिल्ली : गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक आणि मानवजातीला काळीमा फासणारी एक घटना समोर आलीय. एका २३ वर्षीय आदिवासी महिलेला शिक्षा देण्यासाठी तिची निर्वस्र धिंड काढण्यात आली.
महिलेचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा दावा तिच्या पतीने केला होता. त्यानंतर पतीने गावक-यांसोबत मिळून आपल्या पत्नीला निर्वस्र करून गावभर फिरवले. पतीला खांद्यावर उचलून घेऊन चालण्यासाठी तिला भाग पाडण्यात आले. ही घटना ६ जुलै रोजी घडल्याचे समोर येते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. मंगळवारी या घटनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीसहीत इतर १८ आरोपींना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दाहोद जिल्ह्यातील आदिवासीबहुल खजुरी गावात घडली. २३ वर्षीय विवाहित महिला परपुरुषासोबत पळून जात असल्याचा आरोप करत पतीसहीत गावकर्-यांनी तिला अघोरी शिक्षा दिली.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पती आपल्या पत्नीला इतर गावक-यांसोबत मिळून तिला मारहाण करताना दिसत आहे. यावेळी घटनास्थळी अनेक महिला आणि लहान मुलंही उपस्थित होती. काही महिला पीडितेला कपड्यानं झाकण्याचा प्रयत्न करतानाही या व्हिडिओत दिसत आहेत. महिलेला निर्वस्र करण्यात आले तसंच तिला आपल्या पतीला खांद्यावर घेऊन चालण्याची शिक्षा देण्यात आली. पीडित महिला काही दिवसांपूर्वी एका पुरुषासोबत घरातून पळून गेली होती. तिच्या पतीने आणि गावक-यांनी तिचा शोध घेऊन तिला गावात घेऊन आले आणि शिक्षा म्हणून तिच्यावर अशा प्रकारे अत्याचार करण्यात आला. व्हिडिओमध्ये जेवढे आरोपी दिसले त्यांना अटक करण्यात आलीय.