नागपूरकरांवर डेंग्यूचे नवे संकट; कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11489*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

214

नागपूरकरांवर डेंग्यूचे नवे संकट; कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर – नागपुरात कोरोनाचा वाढता संसर्ग कमी झालेला असताना आता डेंग्यूचे नवे संकट उभे ठाकले आहे. शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढत असून प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळून डेंग्यू संपविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन येथील प्रशासन करत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपूर मध्ये हाहाकार होता. आरोग्य विभागाच्या मोठ्या प्रयत्नानंतर आता कोरोनाचे रुग्ण येथे कमी झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी येथे सध्यातरी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. असे असताना आता नागपूरकरांवर पावसाळ्यामुळे येथे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य विषयक तज्ज्ञांनी तसा इशारा दिला आहे. याच कारणामुळे प्रशासनाने येथील नागरिकांना आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात उद्भवतात. त्यातही सध्याच्या अनियमित पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत. परिणामी मच्छरांचे प्रमाणही वाढते. येथील जिल्हाधिकारी आर. विमला यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. डेंग्यूचे मच्छर हे छोट्या डबक्यात निर्माण होतात. हे मच्छर दिवसा चावतात. या मच्छरांपासून बचाव करायचा असेल तर फक्त प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छता पाळणे, घरातील भांड्यात किंवा बाहेर पाणी साचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले