Home Breaking News खडसेेंच्या जावयाला 4 दिवसांची ईडी कोठडी

खडसेेंच्या जावयाला 4 दिवसांची ईडी कोठडी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11484*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

150 views
0

खडसेेंच्या जावयाला 4 दिवसांची ईडी कोठडी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई- भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील पीएमएलए कोर्टाने त्यांना 19 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

जमीन घोटाळा व आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गिरीश चौधरी यांना 5 जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना 15 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची ईडी कोठडी संपत असल्याने त्यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी ईडीच्या अधिकार्‍यांनी चौधरी यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी कोर्टाकडे केली. तसेच या प्रकरणी अनेक साक्षीदार समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचीही चौकशी करायची आहे. यासाठी चौधरी यांच्या कोठडीत वाढ करावी अशी मागणी ईडीच्या अधिकार्‍यांनी कोर्टाकडे केली. यावेळी पीएमएलए कोर्टाने ईडीच्या अधिकार्‍यांची मागणी मान्य करत चौधरी यांच्या कोठडीत चार दिवस म्हणजेच 19 जुलैपर्यंत वाढ केली.