कोरोना झाल्याने वाढदिवशीच सिव्हिल इंजिनीअरची आत्महत्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11480*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

250

कोरोना झाल्याने वाढदिवशीच सिव्हिल इंजिनीअरची आत्महत्या

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थासांगली – कोरोना हा असाध्य आजार नसला तरीही लोकांच्या मनातील भीती अद्यापही दूर झालेली नाही. याच भीतीपोटी सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने आपल्या वाढदिवसादिनीच आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. निखील लक्ष्मण भानुसे (२८) असं या तरुणाचे नाव असून तो व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर होता.

निखिलचा चार दिवसांपूर्वीच कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून तो अस्वस्थ होता. त्याच नैराश्यातून त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. बुधवारी रात्री घरासमोरील जनावरांच्या शेडमध्ये गळफास लावून घेतला. अशी फिर्याद नातेवाईकांनी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी कुरळप पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे.

तीन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
निखीलचं तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. पण कोरोनाची भीती मनात बसल्यानं त्यानं आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.