ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याचा ठराव केल्यानंतरच शाळा सुरू होणार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11466*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

184

ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याचा ठराव केल्यानंतरच शाळा सुरू होणार

विदर्भ वतन, नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार गुरुवार १५ जुलैपासून जिल्हयातील शाळा सुरू होऊ घातल्या आहेत. त्यानुसार शिक्षणाधिका-यांनी सर्व गट विकास अधिका-यांना सूचना केल्या असून, ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याचा ठराव केल्यानंतरच शाळा सुरू होणार आहेत.
कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहे. या सूचनांचे पालक केल्यानंतरच शाळा सुरू करण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहे. ग्रा.पं.चे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करायची आहे. त्याचे सदस्य सचिव ग्रामसेवक राहणार आहे. बुधवारी जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीतदेखील या परिपत्रकावर चर्चा झाली. १५ जुलैपासून ग्रामीण भागात किती शाळा सुरू झाल्या, याचा अहवाल ग्रामसेवकामार्फत गटशिक्षण अधिकारी (बीईओ) कार्यालयाला सादर करायचा आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर शिक्षण व्यवस्था पूर्णत: बंद करण्यात आली होती. त्यानंतर दुस-या लाटनेतरही परिस्थिती सारखीच होती. दरम्यान, राज्यात तिस-या लाटेचा धोका सांगण्यात येत आहे. परंतु, राज्य शासनाकडून उपरोक्त वर्ग सुरू करण्याचे धाडस दाखविण्यात आले आहे.