आईला का मारले म्हणून मोठ्या भावाचा केला खून

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11462*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

245

आईला का मारले म्हणून
मोठ्या भावाचा केला खून

विदर्भ वतन, रामटेक-आईला मारल्याच्या रागाने लहान भावाने मोठया भावाची धारदार शस्त्राने हत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासातच आरोपी भावाला बेड्या ठोकल्या. कृष्णा बाबुराव मसराम (वय ३८) असे मृतकाचे तर प्रमोद बाबुलाल मसराम (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना बुधवारी (१४ जुलै) सकाळी १0 वाजतादरम्यान उघडकीस आली.
या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार, देवलापार पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या चारगाव (मौदी) येथील रहिवासी मृतक कृष्णा बाबुलाल मसराम हा मूळचा चारगाव येथील रहिवासी असून, तो मौदी येथे त्याच्या घरकुलात राहात होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ आरोपी प्रमोद पण राहायचा. दोघात नेहमी वादविवाद होत असल्याने तो खसाळा येथे राहू लागला. मंगळवारी रात्री कृष्णा हा त्याचे आई-वडील राहात असलेल्या चारगाव येथे गेला. येथे त्याने त्याची आई दसवंतीला जबर मारहाण केली. त्यात त्याच्या आईचा पाय फॅक्चर झाल्याचे समजते. अर्थात मारहाणीत आई गंभीर जखमी झाली. आईला भावाने मारल्याची माहिती आरोपी प्रमोदला मिळाली. तो लगेच चारगावला परतला. त्याच्या नातेवाईकांनी दसवंतीला एका खासगी रुग्णालयात व नंतर देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर असल्याने तिला डॉक्टरांनी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात रात्री ११ च्या दरम्यान रेफर केले. रात्री १२ वाजताच्या सुमारास मृत कृष्णा मौदी येथील घरी होता. तर आरोपी प्रमोद हा मौदीवरून आधार कार्ड घेऊन येतो, असे सांगत आईसोबत रुग्णवाहिकेत न जाता मौदी येथे गेला. त्यानंतर त्याने कृष्णाच्या घरात शिरून धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. त्यात कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून तो रात्री आईजवळ निघून गेला. मृत कृष्णा रक्ताच्या थारोळयात असल्याचे काहींच्या लक्षात येताच मौदीच्या पोलिस पाटलांनी पोलिसांत तक्रार केली. आरोपी प्रमोद हा मेडिकलमध्ये असल्याची माहिती मिळताच देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी पोलिस उपनिरीक्षक केशव कुंजरवाड, सतीश नागपुरे व राहुल कॉक्रीटवार, शिवा नागपुरे यांचे पथक नागपूरला रवाना केले व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीला अटक केली. त्याने पुन्हा दोन साथीदाराचे नाव पुढे आणले असून, पोलिस त्याबाबतचा तपास करीत आहे.